बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांच्या नेतृत्वाखाली विकासकामांचा ओघ सुरूच असून, वीरभद्र नगरमधील फारुकिया कॉलनी येथे आज भुयारी सांडपाणी वाहिनीच्या कामाला अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली.


आमदार आसिफ सेठ यांच्या वतीने युवा नेते अमान सेठ यांनी वीरभद्र नगर ६ वा क्रॉस आणि फारुकिया कॉलनीतील या कामाचा शुभारंभ केला. संपूर्ण मतदारसंघाच्या पायाभूत सुविधांसाठी मंजूर झालेल्या ३६ कोटी रुपयांच्या निधीतून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या नवीन सांडपाणी व्यवस्थेमुळे या भागातील रहिवाशांच्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या स्वच्छतेच्या आणि ड्रेनेजच्या समस्यांना कायमस्वरूपी पूर्णविराम मिळणार असल्याचे अमान सेठ यांनी म्हटले.
काम सुरू करताना स्थानिक रहिवाशांशी संवाद साधताना अमान सेठ यांनी मतदारसंघातील नागरिकांच्या जुन्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आमदार कटिबद्ध असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला स्थानिक नगरसेवक आणि मान्यवर उपस्थित होते. आपल्या भागातील मुख्य प्रश्न मार्गी लागत असल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त करत आमदार आसिफ सेठ यांचे आभार मानले आहेत.


Recent Comments