केंद्र सरकारने रोजगार हमी योजनेत क्रांतिकारी बदल केले असून या योजनेला विकसित भारत गॅरंटी असे नवे स्वरूप दिले आहे. या योजनेचे लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप नेत्यांनी आता घरोघरी जाऊन जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.


ग्रामीण भागातील जनतेचा आधार असलेल्या रोजगार हमी योजनेचे केंद्र सरकारने आता विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन असे नामकरण केले आहे. या नवीन योजनेअंतर्गत कामाचे दिवस १०० वरून १२५ पर्यंत वाढवण्यात आले असून केंद्र आणि राज्य सरकार ६० आणि ४० अशा प्रमाणात निधीचा वाटा उचलणार आहेत. विशेष म्हणजे मजुरांना दर आठवड्याला वेतन देणे अनिवार्य करण्यात आले असून ४ दिवसांपेक्षा जास्त विलंब झाल्यास व्याजासह भरपाई देण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. मात्र राज्यामध्ये या योजनेच्या अंमलबजावणीवरून राजकीय वाद सुरू झाला आहे. योजनेच्या नावात राम हा शब्द असल्यामुळे राज्य सरकार आक्षेप घेत असून आपला ४० टक्के वाटा देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते धनंजय जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गावागावात जाऊन महिला मजुरांना या योजनेची सविस्तर माहिती दिली.
विकसित भारत गॅरंटी अंतर्गत काम करणाऱ्या महिलांनी या योजनेचे स्वागत केले आहे. ही योजना पूर्वीपेक्षा अधिक मजूरधार्जिणी आहे मात्र केवळ राम नावाचा समावेश असल्यामुळे काँग्रेस याला विरोध करत असल्याचे धनंजय जाधव यांनी म्हटले.


Recent Comments