maharastara

अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Share

विमान अपघातात दुर्दैवी निधन झालेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे सुपुत्र पार्थ आणि जय पवार यांनी पार्थिवाला भडाग्नी दिला. यावेळी उपस्थित जनसमुदायाने आपल्या लाडक्या नेत्याला साश्रू नयनांनी निरोप दिला.

बारामती येथे २८ जानेवारी रोजी अजित पवार प्रवास करत असलेल्या चार्टर्ड विमानाचा लँडिंग दरम्यान अपघात झाला होता. या भीषण दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव, फ्लाईट अटेंडंट पिंकी माली, पायलट सुमित कपूर आणि को-पायलट शांभवी पाठक यांचा मृत्यू झाला होता. अंत्यसंस्कारापूर्वी सकाळी ९ ते ११ या वेळेत विद्या प्रतिष्ठान संकुलातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती, यावेळी हजारो नागरिकांनी लाडक्या नेत्याचे साश्रूपूर्ण नयनांनी अंतिम दर्शन घेतले.

या अंत्यसंस्काराला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. निरोपाच्या वेळी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर झाले होते. पवार कुटुंबियांसह कार्यकर्त्यांचा आक्रोश मन हेलावणारा होता.

Tags: