लोंढा येथील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पादुका मंदिरात माघ शुद्ध द्वादशीनिमित्त शुक्रवार, ३० जानेवारी रोजी महाराज जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या निमित्त २३ जानेवारीपासून विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सवाच्या नियोजनाबाबत माहिती देताना आयोजकांनी सांगितले की, शुक्रवार २३ जानेवारी ते २९ जानेवारी या कालावधीत दररोज सकाळी ७.३० ते ९.०० या वेळेत महाराजांच्या ओवीबद्ध चरित्राचे पारायण होईल. मंगळवारी कोठीपूजन, तर बुधवारी लोंढा गावातून भिक्षा झोळी फेरी काढण्यात येणार आहे. गुरुवारी सायंकाळी विष्णू सहस्रनाम पठण आणि गोव्यातील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. शिवानी वझे व मनस्वी नाईक यांचे चक्री कीर्तन होणार आहे.
३० जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता जन्मोत्सव पार पडेल. त्यानंतर गुरुकृपा भजनी मंडळाचे भजन, दुपारी १२.३० वाजता महाआरती आणि १.०० ते ४.०० या वेळेत महाप्रसादाचे वाटप केले जाईल. या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी आपल्या कुटुंबियांसह उपस्थित राहावे, असे आवाहन व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


Recent Comments