चिक्कोडी तालुक्यातील चंदूर गावात श्रीशैल जगद्गुरु डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजींच्या सान्निध्यात आमदार गणेश हुक्केरी यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.


चिक्कोडी तालुक्यातील चंदूर गावात चंदूर -यडूर रस्त्यावरील डोणे मळा ते मगदूम शेतापर्यंतचा रस्ता, डोणे मळा ते चदंूरटेक पुलापर्यंतचा १ कोटी १० लाख रुपयांचा रस्ता विकास, ४० लाख रुपये खर्चाचे डॉ. बी.आर. आंबेडकर भवन आणि ५ लाख रुपये खर्चाच्या शुद्ध पाणी पुरवठा केंद्राचे उद्घाटन श्रीशैल जगद्गुरुंच्या उपस्थितीत पार पडले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना चिक्कोडी मतदारसंघाच्या विकासासाठी विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी आणि आमदार गणेश हुक्केरी यांचे योगदान मोठे आहे. पिण्याचे पाणी, शाळांच्या खोल्या, समाजमंदिरांची उभारणी करून ते जनहितार्थ कार्य करत आहेत. हुक्केरी परिवाराने आपल्या घराप्रमाणे या क्षेत्राचा विकास केला असून त्यांचे मतदारसंघावर अपार प्रेम आहे, असे श्रीशैल जगद्गुरु डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य महास्वामीजी यांनी म्हटले.

आमदार गणेश हुक्केरी यांनी चदंूर गावात रस्ते, डॉ. बी.आर. आंबेडकर समुदाय भवन आणि शुद्ध पाणी केंद्राचे लोकार्पण केले असून, मार्च महिन्यात यडूर गावात होणारी कृष्णा आरती, कुंभमेळा आणि लक्षदीपोत्सव यांसारख्या मोठ्या कार्यक्रमांच्या यशासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू, अशी प्रतिक्रिया गणेश हुक्केरी यांनी दिली.
याप्रसंगी ब्लॉक काँग्रेसचे अनिल पाटील, शरत पाटील, चंद्रकांत पाटील, शशिकांत पाटील, विष्णू पाटील, अशोक जमदाडे, सिद्धगौडा मगदूम, गोपाळ मगदूम, मारुती कांबळे, चेतन कांबळे, संतोष कुंभार, वैशाली पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments