महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात झालेले निधन ही अत्यंत क्लेशदायक घटना असून, या दुर्घटनेबद्दल विजापूर जिल्ह्याचे पालकमंत्री एम.बी. पाटील यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

विजापूर जिल्ह्याचे पालकमंत्री एम.बी. पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे श्रद्धांजली वाहताना म्हटले की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा प्रवाशांचा बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाल्याची बातमी मन हेलावून टाकणारी आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून अजित पवार यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.
या दुःखद प्रसंगी पवार कुटुंबाच्या आणि या अपघातात आपले प्राण गमावलेल्या सर्व मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर या कठीण काळात सर्वांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना एम.बी. पाटील यांनी केली आहे.


Recent Comments