Bagalkot

‘व्होट चोरी’च्या आरोपावरून चरंतीमठ यांचे काँग्रेसवर टीकास्त्र

Share

बागलकोट विधानसभा मतदारसंघात मतदार यादी पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसने भाजपवर केलेल्या ‘व्होट चोरी’च्या आरोपांना माजी आमदार वीरण्णा चरंतीमठ यांनी प्रत्युत्तर दिले असून ही प्रक्रिया पूर्णपणे कायदेशीर असल्याचे स्पष्ट केले आहे.

मतदार यादीत गैरप्रकार झाल्याच्या काँग्रेसच्या आरोपावर भाष्य करताना वीरण्णा चरंतीमठ यांनी सांगितले की, ही दरवर्षी होणारी एक सामान्य प्रक्रिया आहे. शिक्षण पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे वगळली जातात आणि नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे यादीत समाविष्ट केली जातात, यामध्ये कोणताही गैरप्रकार नसून सर्व कामे निवडणूक आयोगाच्या नियमांनुसारच सुरू असल्याचे वीरण्णा चरंतीमठ यांनी म्हटले.

एकाच खोली क्रमांकावर अनेक विद्यार्थ्यांची नावे नोंदवल्याच्या आरोपाचा समाचार घेताना त्यांनी स्पष्ट केले की, यूजीसीच्या नियमानुसार एका खोलीत तीन विद्यार्थी राहतात आणि वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याच ठिकाणचा पत्ता देणे आवश्यक असते. काँग्रेसचा हा केवळ गैरसमज असून त्यांनी खुशाल या प्रकरणाची चौकशी करावी, असे आव्हान वीरण्णा चरंतीमठ यांनी दिले.

Tags: