विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले असून, त्यांच्या निधनाबद्दल केएलई संस्थेचे माजी कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी तीव्र दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.

चिक्कोडी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. प्रभाकर कोरे यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. अजित पवार हे त्यांचे काका शरद पवार यांच्यापेक्षाही अधिक वेगाने राजकारणात प्रगती करणारे नेते होते. ते शब्दाचे पक्के होते आणि गरिबांच्या कामाला नेहमी प्राधान्य देत असत. अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हायला हवे होते, मात्र दुर्दैवाने तसे होऊ शकले नाही, अशा भावना डॉ. प्रभाकर कोरे यांनी व्यक्त केल्या.
माझे आणि पवार कुटुंबाचे अत्यंत सलोख्याचे संबंध असून, गेल्याच महिन्यात मिरज येथे आमची भेट झाली होती. त्यांच्या जाण्याने देशाचे मोठे नुकसान झाले आहे, असे डॉ. प्रभाकर कोरे यांनी म्हटले.


Recent Comments