जायंट्स मेन व जायंट्स सोशल वेल्फेअर असोसिएशनचे माजी अध्यक्ष तथा कामगार व औद्योगिक कायद्यांचे ज्येष्ठ व्यवस्थापन सल्लागार परशराम रुद्रप्पा कदम (वय ७०) यांचे निधन झाले.

परशराम कदम यांनी आपल्या कारकीर्दीत कामगार आणि औद्योगिक कायदेविषयक सल्लागार म्हणून प्रदीर्घ काळ सेवा बजावली होती. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून लोकोपयोगी कामे केली. ते निवृत्त पीएसआय राजश्री कदम यांचे पती होत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, दोन जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.


Recent Comments