बेळगाव शहरातील जनतेला दिलासा देणारा आणि विकासाला गती देणारा अर्थसंकल्प यावर्षी सादर केला जाईल, असे महापौर मंगेश पवार यांनी सांगितले. मंगळवारी महानगरपालिकेच्या सभागृहात आयोजित अर्थसंकल्पपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते.


महानगरपालिकेच्या कौन्सिल हॉलमध्ये झालेल्या या बैठकीत महापौर मंगेश पवार यांनी शहरवासीयांच्या मागण्या आणि सूचनांचा विचार करूनच यंदाचे बजेट तयार केले जाईल, असे स्पष्ट केले. यावेळी माजी महापौर विजय मोरे यांनी १ कोटी ३० लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या हायटेक स्मशानभूमीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप केला. या कामाची दुरुस्ती करून अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांची सोय करावी, अशी मागणी विजय मोरे यांनी केली.

चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रभाकर यांनी महापालिकेकडून दिले जाणारे ई-खाते सुलभतेने मिळावे, अशी विनंती केली. तसेच उद्यमनगर सारख्या औद्योगिक भागात मूलभूत सुविधा पुरवाव्यात आणि अनेकवेळा मागणी करूनही उद्योगांना न मिळणारा पाणीपुरवठा तातडीने सुरू करावा, असे प्रभाकर यांनी सांगितले. या बैठकीला उपमहापौर वाणी जोशी, सभागृह नेते हनुमंत कोंगाळी, विरोधी पक्षनेते सोहेल संगोळी आणि महापालिका आयुक्त कार्तिक यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments