कर्नाटक सरकारच्या शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ, मल्लेश्वरम, बेंगळुरू यांच्या वतीने फेब्रुवारी २०२६ मध्ये घेतली जाणारी संगणक परीक्षा १ फेब्रुवारी ते ५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.

या संदर्भात मंडळाच्या राज्य संचालकांनी आदेश जारी केले आहेत. वेळापत्रकानुसार, विद्यार्थ्यांनी आपली हॉल तिकीटं आपापल्या विद्यालयाच्या कार्यालयातून प्राप्त करून घ्यावीत. परीक्षेसाठी बेळगावमधील आर. एन. शेट्टी कॉलेज हे केंद्र निश्चित करण्यात आले असून, विद्यार्थ्यांनी तिथे उपस्थित राहावे, असे आवाहन खडे बाजार, बेळगाव येथील सुनिता इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर्सच्या प्राचार्यांनी केले आहे. तसेच त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


Recent Comments