DEATH

कागवाड येथील जैन समाजाचे नेते अप्पासाहेब गोबाजे यांचे निधन

Share

कागवाड येथील जैन समाजाचे प्रतिष्ठित नागरिक आणि महावीर वृत्ती आश्रमाचे निमंत्रक अप्पासाहेब कल्लाप्पा गोबाजे (वय ७२) यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. बेळगाव येथील अरिहंत रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

अप्पासाहेब गोबाजे यांनी सामाजिक आणि धार्मिक कार्यात नेहमीच पुढाकार घेतला होता. कागवाड येथील महावीर वृत्ती आश्रमाच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्षे निस्वार्थ सेवा बजावली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली आणि मोठा आप्तपरिवार आहे.

Tags: