हुबळी शहरात गेल्या महिनाभरापासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर सोमवारी रात्री विमानतळ परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात अडकला. या कारवाईमुळे विमानतळ परिसर, सुतगट्टी आणि सत्तूर भागातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

१७ डिसेंबरपासून हुबळी विमानतळ, कारवार रोड, सुतगट्टी, गामनगट्टी आणि सत्तूर भागात या बिबट्याचे दर्शन झाले होते. या बिबट्याला पकडण्यासाठी मैसूर, गदग आणि बेळगाव येथून वनविभागाची विशेष पथके पाचारण करण्यात आली होती. अनेक दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतरही बिबट्या हुलकावणी देत होता.
बिबट्याला पकडण्यासाठी विमानतळ परिसरात तीन सामान्य आणि एक तुमकूर मॉडेलचा विशेष पिंजरा लावण्यात आला होता. तसेच बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी २५ हून अधिक ट्रॅप कॅमेरे बसवले होते. सोमवारी रात्री भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या तुमकूर मॉडेलच्या पिंजऱ्यात अडकला, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले.


Recent Comments