Accident

अथणीत भीषण रस्ते अपघात; ऊसाच्या ट्रॅक्टरखाली चिरडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Share

दुचाकीवरील ताबा सुटून ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरखाली पडल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना अथणी परिसरातील द़रूर गावाजवळ घडली आहे.

श्रीशैल हवालदार (वय ५०, रा. तीर्थ गाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीशैल हे अथणीहून सप्तसागरकडे येत असताना द़रूर गावाजवळ हा अपघात झाला.

दुचाकी चालवत असताना अचानक ताबा सुटल्याने श्रीशैल हे रस्त्यावरून जाणाऱ्या ऊसाच्या ट्रॅक्टरखाली पडले. ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी दुचाकीच्या मागे बसलेली व्यक्ती गंभीर जखमी झाली असून, त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी अथणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

Tags: