बेळगावमधील प्रसिद्ध चव्हाट गल्ली येथील ‘बेळगावचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आज गणेश जयंतीचे औचित्य साधून मूर्ती पाटपूजन सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला. क्रांतीसिंह नाना पाटील चौकात झालेल्या या सोहळ्याने शहरात आगामी गणेशोत्सवाची चाहूल लागली आहे.


यावेळी मंडळाच्या वतीने मूर्तिकार रवी लोहार यांना यंदाची मूर्ती साकारण्यासाठी अधिकृतरीत्या पानवेडा आणि श्रीफळ देऊन पाचारण करण्यात आले. या सोहळ्याला मार्केट पोलीस ठाण्याचे निरीक्षक कालीमिर्ची, माजी आमदार अनिल बेनके, विश्व हिंदू परिषदेचे विजय जाधव, व्यापारी रोहित रावळ आणि इतर मान्यवर उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात हा कार्यक्रम पार पडला.

पाटपूजनानंतर आयोजित महाप्रसादाचा सुमारे पाच ते सहा हजार भाविकांनी लाभ घेतला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते. या सोहळ्यापासूनच आता मूर्तीकाम आणि सजावटीच्या नियोजनाला औपचारिक सुरुवात झाली आहे.



Recent Comments