मिरज येथील सचिन हॉस्पिटल तर्फे आयोजित वंध्यत्व निवारण आणि स्त्रीरोग शिबिरास रुग्णांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या शिबिरात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अपत्यहीन दांपत्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या जीवनात नवसंजिवनी देण्याचे कार्य करण्यात आले.

शहापूर येथील सचिन हॉस्पिटलने आयोजित केलेल्या या विशेष शिबिरात महिलांमधील वंध्यत्वाची कारणे, उपचार आणि स्त्रीरोग यावर आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाद्वारे सखोल मार्गदर्शन करण्यात आले. सध्या हॉस्पिटलमध्ये सर्व अद्ययावत सुविधा एकाच छताखाली उपलब्ध असून, याचा समाजातील विविध घटकांना मोठा लाभ होत आहे. अपत्यहीन दांपत्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचे आणि महिलांच्या आजारांवर यशस्वी उपचार करण्याचे आदर्श कार्य या संस्थेमार्फत घडत आहे.
शिबिरामध्ये डॉ. सचिन सुगाणावर यांनी स्त्री व पुरुष वंध्यत्वाची कारणे आणि प्रगत उपचारांची माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने आययूआय (IUI), वीर्यपेढी, स्त्रीबीजदान, गर्भ गोठवून ठेवणे (Vitrification) यासह आयव्हीएफ (IVF), इक्सी (ICSI) आणि इमसी (IMSI) यांसारख्या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानावर त्यांनी प्रकाश टाकला. टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रियेत पेशंटच्या दोषानुरूप उपचार पद्धती निवडावी लागते आणि त्यानुसार खर्च येतो, असे डॉ. सचिन सुगाणावर यांनी स्पष्ट केले.
गर्भाशयाच्या समस्यांबाबत बोलताना डॉ. सुगाणावर यांनी सांगितले की, गर्भाशयातील गाठी किंवा बंद गर्भनलिका यांवर आता ‘अॅब्लीजन टेक्नॉलॉजी’ आणि दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून यशस्वी उपचार शक्य आहेत. अनेकदा गर्भाशय न काढताही उपचार करता येतात. मात्र, शस्त्रक्रिया अनिवार्य असल्यास ती अत्यंत आधुनिक पद्धतीने आणि कमी खर्चात करण्याची सोय हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
हॉस्पिटलमधील आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रयोगशाळा आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीममुळे येथे यशस्वी उपचारांचे प्रमाण अधिक आहे. शिबिरात केवळ वंध्यत्वच नव्हे, तर पुरुष व स्त्रियांच्या लैंगिक समस्या, गुप्त रोग, शुक्राणूंची कमतरता आणि वयोमानानुसार येणारी कमजोरी यावरही मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. सचिन सुगाणावर यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना हॉस्पिटलच्या भविष्यातील नियोजनाची माहिती दिली. शिबिरात मोफत तपासणी व औषधांचा लाभ घेतलेल्या रुग्णांनी हॉस्पिटलमधील आधुनिक यंत्रसामग्री आणि सामाजिक उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले.


Recent Comments