Belagavi

मुडलगी दुष्काळ निधी घोटाळा: भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या खिशातून वसुली करा; भीमप्पा गडाद आक्रमक

Share

मुडलगी तालुक्यातील महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी २०२३ च्या दुष्काळ निवारण निधी वाटपात मोठा गैरव्यवहार केला आहे. हा पैसा दोषी अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करावा, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते भीमप्पा गडाद यांनी केली आहे.

बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत गडाद यांनी या घोटाळ्याचा पर्दाफाश केला. मुडलगी तालुक्यातील २५ गावांमधील ३६८ अपात्र व्यक्तींच्या बँक खात्यात नियमावली धाब्यावर बसवून १ कोटी १३ लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा करण्यात आली आहे. यामुळे पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहिले असून सरकारी तिजोरीचे नुकसान झाले आहे, असा आरोप त्यांनी केला.

या भ्रष्टाचाराचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे देऊन १९ महिने झाले तरी कारवाई झालेली नाही. त्यामुळे गडाद यांनी मुख्य सचिवांना पत्र लिहून दोषी अधिकाऱ्यांच्या वेतनातून ही रक्कम वसूल करण्याची मागणी केली आहे. सरकारने दखल न घेतल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Tags: