बेळगावच्या भडकल गल्ली येथील श्री बनशंकरी देवीच्या मूर्ती पुनर्रप्रतिष्ठापनेनिमित्त आज मंदिरात ‘कुंकुमार्चन’ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.


देवांग हटगार समाज श्री बनशंकरी मंदिर ट्रस्ट कमिटीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यात शेकडो सुवासिनींनी सहभाग नोंदवला. मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर १ फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. याबद्दल अधिक माहिती देताना ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष बसवराज जडपण्णवर म्हणाले की, “२८ जानेवारी रोजी सायंकाळी आरती, २९ जानेवारीला दुर्गासप्तशती पारायण, ३० जानेवारीला पठाण, ३१ जानेवारीला नवचंडी होम आणि १ फेब्रुवारीला देवीचा पालखी उत्सव पार पडणार आहे. त्याच दिवशी दुपारी महाप्रसादाचे वाटप केले जाईल.”

ट्रस्टचे उपाध्यक्ष महेश मुचंडी यांनी सांगितले की, मूर्ती पुनर्रप्रतिष्ठापनेनिमित्त श्रीचक्राची विशेष पूजा देखील आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उमेश चितगी, विजय अक्कतंगेर यांच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले आहेत.


Recent Comments