बेळगावमधील संगमेश्वर नगर येथील डॉ. बी. आर. आंबेडकर निवासी शाळेत विद्यार्थ्यांच्या जेवणात प्लास्टिक आणि लोखंडी तार आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वारंवार तक्रार करूनही वॉर्डन याकडे दुर्लक्ष करत असल्याने विद्यार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शासनाकडून निवासी शाळांसाठी कोट्यवधी रुपयांचे अनुदान दिले जाते, मात्र तरीही विद्यार्थ्यांना सकस आहार मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गुरुवारी चिकनच्या जेवणात प्लास्टिकचे तुकडे आणि नाश्त्याच्या पुलावामध्ये लोखंडी तार सापडल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वॉर्डनच्या निष्काळजीपणामुळेच अन्नामध्ये असे घातक पदार्थ आढळत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
या गंभीर समस्येबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळणाऱ्या दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.


Recent Comments