DEATH

काँग्रेस नेत्या शोभा हेरवाडकर यांचे निधन

Share

बेळगावमधील काँग्रेस नेत्या शोभा अनिल हेरवाडकर (८०) यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले.

शोभा हेरवाडकर यांनी ‘बेळगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक’मध्ये २५ वर्षांहून अधिक काळ संचालिका म्हणून काम पाहिले होते, तर १९९७ मध्ये त्यांनी बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. राजकारणातही त्या सक्रिय होत्या; त्यांनी केपीसीसी महिला घटकाच्या सरचिटणीस म्हणून जबाबदारी पार पाडली होती. १९८९ मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. याशिवाय, त्यांनी जेल कमिटी आणि २० कलमी कार्यक्रमाच्या नामनिर्देशित सदस्या म्हणूनही कार्य केले होते.

त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई, नातवंडे आणि मोठा आप्तपरिवार आहे. बेळगावच्या सदाशिव नगर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Tags: