Belagavi

शिवसेनेतर्फे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी साजरी

Share

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून आज बेळगावच्या खडे बाजार येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवप्रतिमा आणि त्यानंतर बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आर्यन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हणमंत मजूकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना हणमंत मजूकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी सीमालढ्यासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण केले.

यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आणि मिठाई वाटप करून आपला उत्साह साजरा केला.

या सोहळ्याला परशराम गोंदकर, मीनाक्षी पाटील, भारती राक्षे, अमोल माजुकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: