बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यातील जिरगाळ गावाजवळ उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

महाराष्ट्र पासिंगचा हा ट्रॅक्टर उसाने भरलेल्या दोन ट्रॉली घेऊन जात असताना जिरगाळ जवळील महामार्गावर इंजिनमध्ये अचानक आग लागली. आगीने रौद्ररूप धारण करण्यापूर्वीच चालकाने ट्रॅक्टरमधून उडी घेतल्याने त्याचे प्राण वाचले. मात्र, आगीच्या या घटनेत ट्रॅक्टरचे इंजिन संपूर्णपणे जळून खाक झाले आहे.
इंजिनला आग लागताच स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून उसाने भरलेल्या ट्रॉली ट्रॅक्टरपासून वेगळ्या केल्या. त्यामुळे लाखो रुपयांचा ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून वाचला. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. या घटनेची नोंद मुधोळ पोलीस ठाण्यात झाली आहे.


Recent Comments