Bagalkot

बागलकोटमध्ये मास्कधारी टोळीचा धुमाकूळ; हातात रॉड घेऊन फिरतानाचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

Share

बागलकोट जिल्ह्यातील रबकवी शहरात मध्यरात्री शस्त्रांसह वावरणाऱ्या एका टोळीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रबकवी-बनहट्टी तालुक्यातील बसवनगरमध्ये मध्यरात्री पावणेतीनच्या सुमारास सहा जणांची टोळी दिसून आली. या टोळीतील सर्वांनी तोंडाला मास्क लावले होते आणि त्यांच्या हातात लोखंडी रॉड होते. चोरीच्या उद्देशाने घरांच्या परिसरात वावरतानाचे या टोळीचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाले आहे.

या टोळीने काही घरांची कुलपे तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. बनहट्टी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

Tags: