बेळगाव शहरासह उपनगरांमध्ये आज गणेश जयंती अत्यंत भक्तीभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली.


बेळगावच्या सदाशिवनगर येथील श्री हरिद्रा गणेश मंदिराचा २२ वा वर्धापन दिन आणि गणेश जयंती उत्साहात साजरी झाली. यानिमित्त मंदिरात महाभिषेक, नवग्रह पूजा आणि गणहोम असे धार्मिक विधी पार पडले. दुपारी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला, अशी माहिती मंदिराचे पुजारी पवन बेटगेरी यांनी दिली.

तसेच शहरातील तहसीलदार गल्ली येथील गणेश मंदिरातही सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. या ठिकाणी देखील गणहोम आणि विशेष पूजा अर्चा करण्यात आली. बेळगाव परिसरातील सर्वच लहान-मोठ्या मंदिरांमध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती.



Recent Comments