विजापूर शहरात सध्या तोतया पत्रकारांचा सुळसुळाट झाला असून त्यांच्याकडून सामान्यांना त्रास देण्याच्या घटना वाढल्या आहेत. शहरातील रेडिओ केंद्राजवळील एका बारमध्ये घुसून काही जणांनी दारू प्यायल्यानंतर पैसे न देता उद्दामपणा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

विजापूर शहरातील रेडिओ केंद्राजवळ असलेल्या एका बारमध्ये या तोतया टोळीचा खरा चेहरा समोर आला. बारमध्ये आलेल्या दोन व्यक्तींनी मद्यप्राशन केले आणि दारूच्या बाटल्या घेतल्या. मात्र, जेव्हा कर्मचाऱ्यांनी बिल देण्याची विनंती केली, तेव्हा त्यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
बार मालकाने पैशांसाठी तगादा लावला असता, या दोघांनी आपल्या गाडीवर असलेला ‘प्रेस’ असा लोगो दाखवला. “आम्ही कोण आहोत हे तुम्हाला ठाऊक आहे का? तुमच्या बारवर केस करून तो बंद पाडू,” अशा शब्दांत त्यांनी धमकी दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. लोगोचा गैरवापर करून दादागिरी करणाऱ्या अशा तोतयांविरुद्ध पोलीस प्रशासन आणि माहिती विभागाने कडक पावले उचलावीत, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांमधून जोर धरत आहे.


Recent Comments