चिक्कोडी तालुक्यातील इंगळी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी २२ कोटी ११ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार प्रकाश हुक्केरी यांनी दिली.


इंगळी येथे कृष्णा नदीकाठी नवीन घाटाच्या बांधकामाचे भूमीपूजन हुक्केरी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना त्यांनी गावातील विविध विकासकामांचा तपशील दिला. यामध्ये बसवेश्वर मंदिर, रामलिंग मंदिर आणि बीरेश्वर मंदिराच्या बांधकामासह मराठा समाजाच्या समाजमंदिरासाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

गावातील रस्ते खडीकरण आणि डांबरीकरणासाठी सुमारे १४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तसेच शेतकऱ्यांसाठी ४.११ कोटी रुपयांची उपसा सिंचन योजना राबवण्यात येणार आहे. अण्णापूर्णादेवी फाउंडेशनच्या वतीने शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी ५ लाखांची मदत देण्यात आली असून, गावातील सहकारी संस्थांच्या इमारतींची कामेही अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी स्थानिक नेते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments