धारवाडमध्ये एका तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हल्लेखोराने तरुणीच्या चेहऱ्यावर वार करून नंतर तिच्याच ओढणीने गळा आवळून तिचा जीव घेतला.

झकीया (वय २०) असे मृत तरुणीचे नाव असून ती धारवाडमधील गान्धी चौक परिसरातील रहिवासी होती. झकीया ही पॅरामेडिकलचे शिक्षण घेत होती. मंगळवारी संध्याकाळी ती प्रयोगशाळेत (लॅब) जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली होती, मात्र ती परतलीच नाही.
प्राथमिक माहितीनुसार, मारेकऱ्याने आधी तिच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा केल्या आणि त्यानंतर ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली. ही घटना धारवाड विद्यागिरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. या हत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नसून पोलिसांच्या सखोल तपासानंतरच सत्य समोर येईल.


Recent Comments