बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ तालुका तहसील कार्यालयात कायमस्वरूपी तहसीलदार नसल्याने प्रशासकीय व्यवस्था कोलमडली असून आज भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालयातला कुलूप ठोकून जोरदार निदर्शनं केली.

मुधोळ तालुक्यातील या प्रशासकीय संकटामुळे शेतकरी आणि सामान्य जनतेला रोज कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. सरकारच्या या दुर्लक्षित धोरणाचा निषेध करत भाजप नेत्यांनी तात्काळ सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी केली. तहसीलदारांच्या अनुपस्थितीत महत्त्वाच्या फाईल्स प्रलंबित राहिल्याने तालुक्याचा विकास खुंटल्याचा दावा आंदोलकांनी केला.
यावेळी जमखंडीच्या उपविभागीय अधिकारी श्वेता बीडकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांच्यामार्फत सरकारला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. लवकरात लवकर तहसीलदारांची नियुक्ती करण्याचे आश्वासन बीडकर यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, आठवड्याभरात नियुक्ती न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.


Recent Comments