बेळगावमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे डॉक्टरांसाठी ‘निरंतर वैद्यकीय शिक्षण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आधुनिक आव्हाने आणि रुग्ण सेवा या विषयावर या कार्यक्रमात सखोल चर्चा करण्यात आली.


बेळगाव येथील फेअरफिल्ड बाय मॅरियट येथे पार पडलेल्या या उच्चस्तरीय कार्यक्रमात २०० हून अधिक डॉक्टरांनी सहभाग नोंदवला. सकाळच्या सत्रात ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ आणि ‘ॲडव्हान्स्ड लाईफ सपोर्ट’ यांसारख्या जीवरक्षक कौशल्यांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले. तर दुपारच्या सत्रात अरिहंत रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक एम. डी. दीक्षित यांच्यासह आठ नामांकित तज्ज्ञांनी वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती आणि डॉक्टर-रुग्ण यांच्यातील पारदर्शक संवादावर मार्गदर्शन केले. असे त्यांनी म्हटले.
केवळ उपचार करणेच नव्हे, तर रुग्णांशी सहानुभूतीने वागणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज असल्याचे या कार्यक्रमात अधोरेखित करण्यात आले. आयएमएचे अध्यक्ष हेमंत कौजलगी, सचिव राघवेंद्र सागर आणि सीएमई अध्यक्ष विक्रांत घट्टनट्टी यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या परिषदेने डॉक्टरांना नवीन कौशल्ये आत्मसात करण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले, अशी प्रतिक्रिया आयएमएच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.


Recent Comments