विजापूर शहरातील गांधी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध ग्लास लावलेल्या वाहनांविरुद्ध पोलिस निरीक्षक प्रदीप तळकेरी यांनी विशेष मोहीम राबवली.


या कारवाईत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांना थांबवून त्यांचे कूलिंग ग्लास जागीच काढण्यात आले. पोलिस निरीक्षक प्रदीप तळकेरी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी संध्याकाळी ही कारवाई करण्यात आली. रस्ते सुरक्षेसाठी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आल्याचे प्रदीप तळकेरी यांनी स्पष्ट केले.
यावेळी पोलिसांनी वाहनधारकांना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची ताकीद दिली. संशयास्पद हालचाली रोखण्यासाठी आणि पारदर्शकता ठेवण्यासाठी वाहनांना काळ्या फिल्म्स किंवा कूलिंग ग्लास लावणे कायद्याने गुन्हा असल्याचे प्रदीप तळकेरी यांनी म्हटले.


Recent Comments