Accident

रायचूरमध्ये भीषण अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू

Share

रायचूर जिल्ह्यातील सिंधनूर तालुक्यात आज रक्ताचा थरार पाहायला मिळाला. टमटम आणि बोलेरो पिकअप वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

सिंधनूर तालुक्यातील बुध्दीहाळ कॅम्पजवळ हा हृदयद्रावक अपघात घडला. आंध्र प्रदेशातील प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या टमटमला समोरून येणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू आहे.

या घटनेत अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना स्थानिकांच्या मदतीने तातडीने सिंधनूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: