Khanapur

लिंगनमठ पिकेपीएस संस्थेमार्फत शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वितरण

Share

खानापूर तालुक्यातील लिंगनमठ येथील प्राथमिक कृषी पत्ती सहकारी (पिकेपीएस) संस्थेच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्याने दोन शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. बेळगाव डिसिसी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांच्या हस्ते या ट्रॅक्टरच्या चाव्या संबंधित शेतकऱ्यांना प्रदान करण्यात आल्या.

लिंगनमठ पिकेपीएस संस्थेच्या माध्यमातून आणि बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहभागातून नागराज हनुमंत पालकर आणि प्रवीण होन्नप्पा नीलजकर या दोन शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदी केले आहेत. या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत ट्रॅक्टर हस्तांतरित करण्यात आले. कृषी क्षेत्रात आधुनिक यंत्रांचा वापर वाढावा आणि शेतकऱ्यांचे कष्ट कमी व्हावेत, या उद्देशाने हे सहकार्य करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी लिंगनमठ पिकेपीएस संस्थेचे अध्यक्ष श्रीशैल माटोळी, लिंगनमठ ग्रामपंचायतीचे अध्यक्ष तथा पिकेपीएस संचालक काशीम हट्टीहोळी, उपाध्यक्ष दशरथ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी लाभार्थी शेतकऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी संस्थेचे संचालक पांडुरंग पाटील, प्रकाश विजापूर, मायकल फर्नांडिस, संगमेश पाटील, कल्लाप्पा संगोळी, बसप्पा सत्तेन्नवर, सरोजा बागेवाडी, सुरेखा आंबडगट्टी यांच्यासह बँक निरीक्षक एस. के. हिरेमठ, गुंजी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गावडे, गोदोळी संस्थेचे महेंद्र देसाई आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: