Chikkodi

सुनील शिंदे यांना पीएचडी पदवी प्रदान

Share

केएलई इंजिनिअरिंग कॉलेजच्या एमसीए विभागाचे प्रमुख सुनील शिंदे यांना विश्वेश्वरैया तांत्रिक विद्यापीठाने पीएचडी पदवी प्रदान केली आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दर्शनकुमार बिळ्ळूर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले कि, सुनील शिंदे यांनी ‘बहुभाषिक वातावरणातील डिजिटल दस्तऐवजांमधील लिपी ओळखण्याबाबतचा अभ्यास’ या विषयावर आपला शोधप्रबंध सादर केला होता. त्यांना केएलई शेषागिरी तांत्रिक महाविद्यालयाच्या संगणक शास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. व्ही. एस. मळीमठ यांनी मार्गदर्शन केले.

या यशाबद्दल प्राचार्य डॉ. दर्शनकुमार बिळ्ळूर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. कुमार चौगला, प्रा. प्रदीप होदलूर, डॉ. वीरणा मोदी, प्रा. संगीता वाटेगावकर, डॉ. संजय अंकली यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख आणि प्राध्यापक उपस्थित होते.

Tags: