Accident

विजापूर शहरात पाच खासगी बसचा भीषण साखळी अपघात

Share

विजापूर शहरातील ललित महल हॉटेलसमोर पाच खासगी बसचा भीषण साखळी अपघात झाला आहे. एका अनियंत्रित बसने उभ्या असलेल्या इतर बसना मागून जोराची धडक दिल्याने ही दुर्घटना घडली.

या अपघातात बस चालक जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. बेंगळुरू आणि मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना घेऊन या बस निघण्याच्या तयारीत असताना मागून येणाऱ्या बसने त्यांना धडक दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली.

अपघातामुळे महामार्गावर किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ही वाहतूक कोंडी फोडताना पोलिसांची मोठी ओढाताण झाली असून प्रवाशांचेही हाल झाले. ही घटना स्थानिक वाहतूक पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Tags: