बेळगाव येथील हिंदवाडी भागात क्रांती महिला मंडळ आणि उमा संगीत प्रतिष्ठानच्या वतीने हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.


प्रेमा देवी निंगप्पा अण्णिगेरी आणि इंदिरा माणिक शंकरगौडा यांनी धान्याच्या राशीचे पूजन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना प्रेमादेवी अण्णिगेरी म्हणाल्या, भारतीय भव्य परंपरा आणि संस्कृतीमध्ये अनेक आचार-विचार आहेत. संक्रांती हा धरणीमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी इंदिरा शंकरगौडा यांचा दोन्ही मंडळांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाच्या अध्यक्षा मंगला मठद, आशा होसमनी, शैला देशपांडे , गीता एम्मी, रत्नश्री गुडेर, ममता आंटीन, प्रेमा उपाध्ये, भारती रत्नपगोळ आदी मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments