hubbali

२०२८ पर्यंत मुख्यमंत्रीपद रिकामे नाही; जमीर अहमद खान यांचे विधान

Share

राज्यात २०२८ पर्यंत मुख्यमंत्रीपद रिक्त नाही, तोपर्यंत सिद्धरामय्या हेच मुख्यमंत्री राहतील, असे गृहनिर्माण मंत्री जमीर अहमद खान यांनी हुबळीत स्पष्ट केले.

मुख्यमंत्री बदलाचा निर्णय केवळ हायकमांड घेऊ शकते आणि ते ज्याला मुख्यमंत्री करतील तो आम्हाला मान्य असेल, असेही त्यांनी नमूद केले. बळ्ळारीतील भाजपच्या पदयात्रेवर बोलताना त्यांनी जनार्दन रेड्डी यांनी मोठे मन दाखवायला हवे होते, अशी प्रतिक्रिया दिली. तसेच २४ जानेवारी रोजी राज्यात ४२,३४५ घरांचे वाटप करण्यात येणार असून या कार्यक्रमाला मल्लिकार्जुन खर्गे आणि मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

केंद्र सरकार गरिबांच्या घरांवर १८ टक्के जीएसटी लावत असल्याचा आरोप करत जमीर अहमद यांनी भाजपवर टीका केली. भाजप सरकारने आपल्या काळात एकही घर दिले नाही, मात्र आम्ही गॅरंटी योजनांसोबतच गरिबांना घरेही देत आहोत, असे त्यांनी सांगितले.

Tags: