Belagavi

शहापूरमध्ये दुर्गादेवी-मातंगी देवी जत्रोत्सवाचा जल्लोष

Share

शहापूर येथील गडेमार्गस्थित सिद्धार्थ कॉलनीमध्ये श्री दुर्गादेवी-मातंगी देवी जत्रा महोत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात सुरू झाला आहे. या जत्रेचे मुख्य आकर्षण असलेला देवीचा भव्य पालखी सोहळा शनिवारी अत्यंत थाटामाटात संपन्न झाला.

पालखी मिरवणुकीने सिद्धार्थ कॉलनी आणि शहापूरच्या काही भागांत प्रदक्षिणा घातली, जिथे ठिकठिकाणी भाविकांनी देवीची पूजा केली. मंगळवारी, २० जानेवारी रोजी देवीची विशेष पूजा आणि सुवासिनींकडून ओटी भरण्याचा धार्मिक कार्यक्रम शास्त्रोक्त पद्धतीने पार पडणार आहे. या दिवशी शहापूर आणि परिसरातील महिला भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

बुधवारी, २१ जानेवारी रोजी जत्रा महोत्सवाचा मुख्य टप्पा असलेला महाप्रसाद वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दुपारी १२:०० ते ३:०० या वेळेत सार्वजनिक अन्नसंतर्पण होणार असून, परिसरातील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, अशी विनंती श्री दुर्गादेवी-मातंगी जत्रा महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

Tags: