लोंढा रेल्वे फाट्याजवळ शुक्रवारी रात्री झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला. नाऊ बाबू खरात (वय २३, रा. गवळीवाडा, वरकड) असे मृताचे नाव आहे. रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या सिमेंटच्या बॅरिकेड्सला दुचाकीने जोरात धडक दिल्याने हा अपघात घडला.

मृत नाऊ खरात हा शुक्रवारी मावशीच्या घरी गेला होता. मात्र, रात्री ८.३० च्या सुमारास लोंढा रेल्वे गेटजवळ त्याची दुचाकी रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या सिमेंट बॅरिकेड्सवर आदळली. धडक इतकी भीषण होती की, दोन बॅरिकेड्सच्या मधोमध नाऊ अडकला आणि गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच लोंढा ओपीचे विवेक वडे, एफ. मुल्ला आणि प्रवीण करंबळकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. खानापूरचे पोलीस निरीक्षक लाडसाब गौंडी यांनीही अपघातस्थळाला भेट देऊन पाहणी केली. शनिवारी सकाळी मृतदेहाची उत्तर तपासणी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत तरुणाच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.


Recent Comments