Kagawad

ऐनापूरमध्ये रंगली बैल आणि घोडा गाडी शर्यत

Share

ऐनापूर येथील सिद्धेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैल आणि घोडा गाडी शर्यतीला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या चित्तथरारक शर्यती पाहण्यासाठी पंचक्रोशीतील अनेक तरुणांनी मोठी गर्दी केली होती.

शनिवारी सकाळी मुळे-ऐनापूर मार्गावर ही स्पर्धा पार पडली. यामध्ये एकूण दहा घोडा गाड्यांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत शेजारील मिरज तालुक्यातील नरवाड गावच्या सचिन कट्टीकर यांच्या गाडीने प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना महावीर ब्याळी यांच्या वतीने २० हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिरज तालुक्यातील आरग गावच्या किरण नायक यांच्या गाडीने पटकावला, ज्यांना पवन रेसिडेन्सी यांच्याकडून पारितोषिक देण्यात आले. तृतीय क्रमांक ऐनापूरच्या अमसिद्ध अडिशेरी यांनी, तर चतुर्थ क्रमांक गोपाळ अपराज यांच्या गाडीने पटकावला.

बक्षीस वितरण समारंभाला यात्रा कमिटीचे अध्यक्ष दादा जंतनवार, अण्णासाहेब दुगुणवर, राकेश बनिजवाडा, गोपाळ मानगावे, तात्यासाहेब कुरबू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: