बेळगाव हव्यक क्षेमाभिवृद्धी संघाच्या वतीने मकर संक्रांतीचा सण विविध सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला.


शहरातील श्रीकृष्ण देवराय सर्कलजवळील ‘गीत-गंगा’ इमारतीत हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यावती हेगडे यांच्या प्रार्थना गीताने झाली. यावेळी संघाचे उपाध्यक्ष गणेश हेगडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर अध्यक्षा पौर्णिमा हेगडे यांनी प्रास्ताविक भाषणातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. समाज संघटनेच्या बळकटीकरणासाठी परमेश्वर हेगडे आणि सत्यनारायण भट्ट यांनी मोलाचे सल्ले दिले. सुशीला भट्ट, सरस्वती हेगडे आणि सुप्रिया बाविमने यांनी पारंपरिक गाणी सादर करून कार्यक्रमात चैतन्य निर्माण केले.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘प्रतिभा पुरस्कार’ वितरण. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल रश्मी हेगडे, डॉ. विशाखा हेगडे, धीरज बाविमने, पूर्णा हेगडे, राजेश्वरी हेगडे आणि डॉ. सिंधूर जोशी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच एम. एस. भट्ट, सुरेश के. आणि रामचंद्र याजी यांसारख्या नूतन सदस्यांचा परिचय करून देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी एम. टी. हेगडे, सी. जी. शास्त्री, सुब्रमण्य हेगडे आणि डॉ. जी. एस. मंजुनाथ यांनी प्रायोजकत्व भूषवले होते. यावेळी एम. के. हेगडे, चंद्रशेखर शास्त्री, एम. आय. हेगडे, व्ही. एन. हेगडे, जी. एस. बैलकेरी यांच्यासह समाजातील शेकडो नागरिक उपस्थित होते. सुब्रमण्य भट्ट यांनी सूत्रसंचालन केले.


Recent Comments