बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यातील हिरेपडसलगी गावात एका शेतघरात महिलेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान केली आहेत.

यमनव्वा सिद्धनगौडा पाटील असे मृत महिलेचे नाव असून त्यांचे वय ४५ वर्षे होते. राहत्या शेतघरात झोपलेल्या अवस्थेतच त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या गळ्यावर आणि गालावर जखमेच्या खुणा स्पष्टपणे दिसून येत आहेत. अज्ञात हल्लेखोरांनी गळा दाबून ही हत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, या हत्येमागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
घटनेची गांभीर्याने दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक सिद्धार्थ गोयल, डीवायएसपी सय्यद रोशन जमीर आणि सावळगी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी सावळगी पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे त्यांनी नमूद केले.


Recent Comments