बेळगावातील कपिलेश्वर परिसरात १८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या विराट हिंदू संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आज शहरात भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीने संपूर्ण शहरात हिंदू शक्तीचे दर्शन घडवले असून संमेलनासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे.


आज सकाळी शहरातील ऐतिहासिक टिळक चौकातून या रॅलीला प्रारंभ झाला. टिळक चौकातून निघालेली ही रॅली कोणावळ गल्ली, चर्च रोड, ग्लोब टॉकीजमार्गे अंबाभवन येथे पोहोचली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज रोड, शेरी गल्ली, मठ गल्ली आणि काळमठ रोडवरून ही रॅली मारुती गल्लीत दाखल झाली. रॅलीच्या मार्गावर ठिकठिकाणी भगवे ध्वज फडकवत हिंदुत्वाचा जयघोष करण्यात आला.

मारुती गल्लीतून किर्लोस्कर रोड, संयुक्त महाराष्ट्र चौक आणि खडे बाजार मार्गे ही रॅली समादेवी गल्लीत पोहोचली. रॅलीची सांगता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात करण्यात आली. यावेळी शंभू तीर्थावर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला विधीवत अभिषेक आणि पूजन करण्यात आले. १८ जानेवारीच्या मुख्य संमेलनातही हिंदू बांधवांनी अशाच मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी यावेळी केले.

या भव्य रॅलीमध्ये शहरातील हजारो हिंदू बांधव आणि शिवप्रेमी सहभागी झाले होते. रॅलीच्या मार्गावर पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. या संमेलनामुळे संपूर्ण बेळगाव शहर आता भगवेमय झाल्याचे पाहायला मिळत आहे, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.


Recent Comments