hubbali

हुबळीत १५ किलो गांजा जप्त; मुंबईच्या दोन तस्करांना बेड्या

Share

मुंबईहून हावेरीकडे गांजाची तस्करी करणाऱ्या दोन तस्करांना सीसीबी पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल १५ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. हुबळी शहरात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

मुंबईचे रहिवासी असलेले परीज जहीर खान आणि सलमान रईजाखान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. काल हे आरोपी हावेरी जिल्ह्यातील हाणगलकडे गांजा घेऊन जात असताना, सीसीबी पोलिसांनी मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी १५ किलो ४८३ ग्रॅम गांजा, तीन मोबाईल फोन आणि तस्करीसाठी वापरलेली कार जप्त केली आहे. याप्रकरणी हुबळी येथील कसाबा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींनी हा गांजा कोठून आणला आणि तो कोणाला दिला जाणार होता, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Tags: