बेळगावमधील सुप्रसिद्ध उद्योजक उदयकुमार तेरणी (५९) यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि मोठा आप्तपरिवार आहे. ते बेळगावमधील प्रसिद्ध वेंकटेश स्टोअर्सचे संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी १२ वाजता सदाशिवनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बेळगावमध्ये रिद्धी व्हिजनची सुरुवात झाल्यापासून ते मेट्रोकास्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अस्तित्वात येईपर्यंत त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. संस्थेचे संचालक दिवंगत निशा छाब्रिया आणि नागेश छाब्रिया यांच्याशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. संस्थेच्या प्रगतीत त्यांचा मोठा वाटा होता. मेट्रोकास्ट इंडिया परिवाराशी त्यांचे नाते इतके घट्ट होते की, ते या संस्थेचा एक अविभाज्य भागच बनले होते.
उदयकुमार तेरणी हे गाणिग समाजातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होते. अत्यंत कमी वयात त्यांनी जगाचा निरोप घेतल्यामुळे त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कठीण प्रसंगातून सावरण्यासाठी आणि हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर त्यांच्या परिवाराला देवो, अशी प्रार्थना मेट्रोकास्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक नागेश छाब्रिया यांनी केली.


Recent Comments