मारीहाळ गावातील गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या एका बालकाला लक्ष्मी ताई फाउंडेशनच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली.

नागरत्न फकीरप्पा बळ्ळोडी यांचा ५ वर्षांचा मुलगा आजारी असून त्याच्या उपचारासाठी मदतीची गरज होती. या कुटुंबाच्या मदतीला धावून जात विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी धनादेश सुपूर्द केला.
मुलाच्या पुढील उपचारासाठी आम्ही खंबीरपणे पाठीशी आहोत, अशी ग्वाही देत त्यांनी पालकांना धीर दिला. तो बालक लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली असल्याचे त्यांनी म्हटले.


Recent Comments