विजापूर जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील होनावाड गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग ५४८ बी वर एक भीषण रस्ते अपघात झाला. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला महिंद्रा पिकअप वाहनाने समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत पिकअपमधील एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातातील मृत आणि जखमी हे पश्चिम बंगाल राज्यातील मूळ रहिवासी आहेत. हे सर्वजण जिल्ह्यात विंड पॉवरच्या कामासाठी आले होते. जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
तिकोटा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. मृत आणि जखमींची नावे तसेच पत्ता शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. याप्रकरणी तिकोटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.


Recent Comments