धारवाड शहराच्या बाहेरील राष्ट्रीय महामार्गावर यरिकोप्पा गावाजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. वेगात असलेली कार रस्त्यावर उलटली, मात्र सुदैवाने या घटनेत कारमधील पाचही प्रवासी थोडक्यात बचावले असून मोठी जीवितहानी टळली आहे.


धारवाड तालुक्यातील यरिकोप्पा जवळील राष्ट्रीय महामार्गावर ही दुर्घटना घडली. चालकाचा ताबा सुटल्याने कार पलटी होऊन रस्त्याच्या कडेला पडली. अपघात होताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. दैव बलवत्तर म्हणून या भीषण अपघातात कोणाचाही जीव गेला नाही.
घटनेची माहिती मिळताच धारवाड ग्रामीण पोलिसांनी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानंतर जखमींची नावे आणि ते कोठून कुठे जात होते, याची सविस्तर माहिती समोर येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.


Recent Comments