DEATH

कालव्यात पडून विद्यार्थ्याचा मृत्यू; शाळा कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणावर संताप

Share

हुक्केरी तालुक्यातील हिडकल डॅमजवळील मुरारजी देसाई निवासी शाळेचा आठवीतील विद्यार्थी कार्तिक मन्जुनाथ गाडीवड्डर (१४) याचा कालव्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला.

मंगळवारी शाळेच्या वेळेत तीन विद्यार्थी जवळच असलेल्या कालव्यावर गेले होते. पाण्याच्या प्रवाहात दोघे वाहून जात असताना एकाला वाचवण्यात आले, मात्र कार्तिकचा बुडून मृत्यू झाला.

शाळेच्या कर्मचाऱ्यांनी कार्तिकचा मृतदेह खाजगी वाहनातून हुक्केरी सरकारी रुग्णालयात आणला. मात्र, शाळेच्या वेळेत मुले बाहेर गेलीच कशी? असा संतप्त सवाल नातेवाईकांनी केला आहे. कार्तिकचा नातेवाईक केम्पण्णा यांनी आरोप केला की, “शाळेतून आम्हाला फोन आला की मुलगा बेशुद्ध आहे, पण आम्ही पोहोचेपर्यंत तो वारला होता. रात्री काही अज्ञात लोकांनी येऊन आम्हाला पैशांचे आमिष दाखवून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आम्हाला घातपाताचा संशय आहे.”

जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी आणि शाळेचे प्राचार्य सोबद व वॉर्डन महांतेश नाईक यांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी पालकांनी केली आहे. याप्रकरणी यमकनमर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: