कगवाड तालुक्यातील ऐनापूर येथील प्रसिद्ध करि सिद्धेश्वर यात्रेनिमित्त आयोजित ३३ व्या कृषी मेळाव्याचे उद्घाटन काँग्रेसचे युवा नेते राहुल सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते झाले. सीमाभागातील युवा शेतकऱ्यांसाठी असे मेळावे दिशादर्शक ठरतात, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.


बुधवारी संध्याकाळी अमरेश्वर महाराजांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी राहुल जारकीहोळी यांनी प्रदर्शनातील ट्रॅक्टर आणि नवीन वाहने चालवून उद्घाटन केले. या मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी आधुनिक यंत्रसामग्री आणि विविध शासकीय योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कवलगुड्डा मठाचे अमरेश्वर महाराज यांनी मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरण्याचे आवाहन केले. तसेच, पुढील वर्षीच्या यात्रेत अनुभवी ज्येष्ठ शेतकऱ्यांचा विशेष सत्कार केला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.
या कार्यक्रमाला मंदिर समितीचे अध्यक्ष सुभाष पाटील, यात्रा कमिटीचे अध्यक्ष दादा जंतण्णावार आणि ऐनापूरमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments