धारवाड येथील निर्मल नगर भागात धुरामुळे गुदमरून मृत्यू झालेल्या बिबेक (४०) या नेपाळमधील व्यक्तीवर धारवाडमध्येच अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतदेह मायदेशी नेणे शक्य नसल्याने पोलिसांनी पुढाकार घेत कुटुंबाला सहकार्य केले.

धारवाडमधील एका हॉटेलमध्ये कामाला असलेल्या बिबेकचा शुक्रवारी रात्री शेगडीच्या धुरामुळे झोपेतच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच त्याचा भाऊ विज्ञान पाडेल नेपाळहून धारवाडला पोहोचला.
हुबळी-धारवाड पोलीस आयुक्तांनी या कठीण प्रसंगी संवेदनशीलतेने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत केली. “परिस्थितीमुळे भावाचा मृतदेह गावी नेणे शक्य नव्हते, मात्र पोलिसांनी मोलाचे सहकार्य केले,” अशी प्रतिक्रिया विज्ञान पाडेल यांनी व्यक्त केली.


Recent Comments